बहुमानाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर

मराठी रंगभूमि /नाट्य -चित्रपट कलावंत 

१४ जून रोजी सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल येथे पुरस्कार प्रदान सोहळा

मुंबई : मराठी नाट्य आणि चित्रपट ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा बहुमानाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. मात्र आता नाट्य परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर लगेचच नवनिर्वाचित नियामक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार समारंभाचे नियोजन केले आहे. दरवर्षी १४ जून रोजी नाट्य
परिषदेच्या वतीने गो. ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात येते.

येत्या १४ जून रोजी सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल येथे पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. या निमित्ताने कलावंतांचा मेळावा होणार असून, शंभराव्या नाट्य संमेलनानिमित्ताने घेण्यात आलेल्या ‘नाट्यकलेचा जागर’ मधील सर्वोत्तम कार्यक्रमही यावेळी सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशांत दामले या पुरस्कार  सोहळ्याच्या निमित्ताने मध्यमाना  दिली.