🔶 ठेवीदार बेहाल , मात्र तपास अधिकारी मालामाल. 🔶 जिल्हा पोलिस दलाने विश्वास गमावला
ठेवीदारांचा उग्र अवतार,
🔺 खाडेला न्यायालयाने २९ मेपर्यंत पोलिस कोठडी
बीड : मल्टिस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी १ कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या हरिभाऊ खाडे विरोधात जिजाऊ मल्टिस्टेटचे ठेवीदारांचा उग्र अवतार शुक्रवारी कोर्ट परिसरात दिसून आला. हरिभाऊ खाडेला कोर्टातून बाहेर आणते वेळी दाराजवळ लाचखोर हरिभाऊ खाडे मुर्दाबाद, खंडेच धिक्कार असो अशा घोषणा देत शिवीगाळ करत जोरदार घोषणादिल्या .ठेविदाराउह प्रचंड आक्रमक रित्या आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, खाडेला न्यायालयाने २९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जिजाऊ मल्टिस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडून १ कोटी रुपयांची लाच हरिभाऊ खाडे याने 1 कोटी लाचेची मागणी केली होती.या तपास प्रकरणी त्याचा सहायक फौजदार आर. बी.जाधवरसह खासगी इसम कुशल जैन
याच्याविरोधात १५ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. मागणीतील १ कोटीपैकी पाच लाख रुपये घेताना जैनला ताब्यातही
घेतले होते तर खाडे आणि जाधवर हे दोघेही फरार होते.
दरम्यान हरिभाऊ खाडेच्या घरात झडती मध्ये रोख १ कोटी ८ लाखांची रोकड, किलोभर सोने आणि साडेपाच किलो चांदी
आढळून आली होती, तर सहायक फौजदार आर. बी.जाधवरच्या घरातही सोने आणि चांदी सापडली होती . फरारी झालेल्या या दोघांच्या तपासासाठी एसीबीने पथकेही नियुक्त केली होती. इकडे तिकडे आठवडाभर धावपळ
करून खाडे हा गुरुवारी एसीबीसमोर शरण आला होता तर जाधवर हा अजूनही फरार आहे.
दरम्यान, खाडेला शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला २९ मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. न्यायालयातून बाहेर काढून एसीबी कार्यालयात वाहनातून नेत असताना काही उपस्थित ठेवीदारांनी पोलिसांसमकक्ष जोरदार
शिवीगाळही केली.

