२७ मे रोजी दहावीचा निकाल

🔸एस एस सी परीक्षा निकाल

🔶 १६ लाख ९ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

पुणे-राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांकडून घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थ्यांना निकालाची आतुरता असते.

mahresult.nic या वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहता येईल. राज्यात 1 मार्च ते 26 मार्च 2024 दरम्यान दहावीची परिक्षा पार पडली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.