पुणे हिट अँड रनप्रकरणी ससूनमधील 2 डॉक्टरांना अटकः

अग्रवाल चे ससून लॅब कनेक्शन/पैसा बोलता है

🔶 ब्लड सॅम्पलमध्ये अदलाबदल ससून मध्ये अग्रवाल चे कारनामे, ससून मधील बरबटलेले दोन लॅब कर्मचारी 🔺करप्ट सिस्टिम

पुणे: पुण्यातील अपघाताप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी एक धडक कारवाई केली आहे. मस्तवाल अग्रवाल च्या नातवाला वाचवण्यासाठी  ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याच्या आरोपावरून ससूनमधील 2 डॉक्टरांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दरम्यान, कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला लागली आहे..

अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल मिळालेल्या माहितीनुसार, धनिकपूत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांनीही गैरकृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. अजय तावरे आणि श्रीहरी हरलोर, अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. त्यांच्यावर अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते की नाही हे तपासण्यासाठी तब्बल नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात ब्लड टेस्ट केली होती. मात्र ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याचा प्रकार आता समोर आला आहे.

पोलिसांना आधीच संशय आल्याने दुसऱ्यांदा ब्लड टेस्ट अपघात झाल्यानंतर या अल्पवयीन आरोपीच्या रक्तात मद्याचा किती अंश आहे, हे तपासण्यासाठी तातडीने त्याची ब्लड टेस्ट करणे अपेक्षित होते. मात्र, अपघात झाल्यानंतर तब्बल नऊ तासांनी त्याला ससून रुग्णालयात ब्लड टेस्ट करण्यासाठी नेण्यात आले. याप्रकरणात आरोपीला मदत झाल्याच्या संशयाने पोलिसांनी पुन्हा त्याच दिवशी संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात आरोपीच्या रक्ताची चाचणी केली.

फॉरेन्सिक लॅबचे HOD डॉ. अजय तावरे

दरम्यान, सध्या पोलिस आयुक्तलयात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी सुरू आहे. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे. अटक करण्यात आलेले डॉ. अजय तावरे हे ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबचे एचओडी आहेत. तर डॉ. श्रीहरी हरलोर हे रुग्णालयाचे सीएमओ आहेत. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हे दोन्ही नमुने फॉरेन्सनिक लॅबकडे पाठवण्यात आले. तसेच ससून आणि खासगी रुग्णालयातील ब्लड सॅम्पल्स एकाच व्यक्तीचा आहेत की नाही, याचीही तपासणी करावी, असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.