पोलीस रेकॉर्ड वर नवे चेहरे;

गुन्हे /गुन्हेगारी/ कायदा सू-व्यवस्था / सार्वजनिक जीवन 

🔶 शहरात पिस्टल, विक्री, दुचाकी, चारचाकी वाहनचोरी आणि भाईगिरी मध्ये वाढ,

बीड/परळी वैजनाथ-एम एन सी न्यूज नेटवर्क – राज्यात आणि जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुका तसा सर्व परिचित असा आहे. तालुक्यातील वाढती गुन्हेगारी सर्वसामान्यांसाठी चिंतेचा आणि त्रासाचा विषय असला तरी गुन्हेगारी जगत आणि पोलिस यांच्या साठी या बाबी अतिशय सामान्य आहेत. शहरात वाढणाऱ्या दुचाकीं, चार चाकीच्या चोऱ्या, भांडणे, धमकावणे, वाटमारी, मारामारी, गावठी कट्टा, पिस्तूल, कत्ती याची विक्री व बाळगणारे , सार्वजनिक जागेत नशापाणी करणे असे प्रकार वाढले आहेत. शहर आणि तालुक्यातील मागील काही महिन्यात आढळुन आलेले मृत देह आणि खुनाचे प्रकार यात असणारे अल्पवयीन आणि वीस-बावीस वर्षांच्या तरुण मुलांचा सहभाग अविश्वसनीय आहे. गुन्हेगारी जगात होत असलेला त्यांचा शिरकाव पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डर वर नोंद होत आहे. तर काहींचे नाव रेकॉर्डवर येऊ नये या साठी पाठीराखे कार्यरत असल्याचेही चित्र आहे.

तालुक्यासह जिल्हाभरात क्राईम चा आलेख उंचावत आहे. ही मुख्य चिंतेची बाब असून पोलीस प्रशासनाचा आणि कायद्याचा धाक आता गुन्हेगारी जगतावर राहिलाचं नाही असे चित्र सध्या जिल्हाभरात दिसून येत आहे.मागील सहा महिन्यांत शहराच्या विविध भागांत मृत देह आढळणे या घटना पोलिसांनी अतिशय सहजतेने घेतल्या सारखी परिस्थिती आहे. ग्रामीण भागामध्ये विहिरीवरील विद्युतपंप, स्प्रिंकलर चे नोजल, तीन चाकी, दुचाकी, आणि ट्रॅक्टरची बॅटरी, वायर, वीज केंद्र परिसरातील भंगार चोरी याच्या बातम्या दर दिवशी वाचनात आणि पाहण्यात येत आहेत.

परळी शहरात असलेल्या तीन ही पोलिस ठाणे हद्दीमध्ये जानेवारी महिन्यापासून आजतागायत खून मारामारी दुचाकींची चोरी अशा प्रकारची मोठी नोंद होत आहे. दरम्यान या सगळ्या प्रकारावर पोलिसांचा अंकुश असावयास हवा असं सर्वसामान्य नागरिकांची प्रामाणिक भावना असते मात्र चित्र उलटे होत आहे. परळी तालुक्यात मारामारी, दुचाकीची चोरी,धमक्या, वाटमारी मोठ्या प्रमाणात होत आहेत . परळी परिसरातील मारामारी मध्ये १५ पासून २५ वर्षापर्यंतच्या मुलांचा सहभाग आढळून येत आहे. पोलीस प्रशासनाचा आणि कायद्याचा धाक, जरब निर्माण करणेही ही मुख्य गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

कायद्याचा धाक आणि पोलिस प्रशासनाचा वचक कमी झाल्यामुळेच अनेकांना गुन्हा करूनही आपण जामिनावर बाहेर येऊत अशा कल्पना मध्ये काही वावरत आहेत. तर गल्लीबोळात आणि शहराला येऊन भेटणार अनेक रस्त्यावर वाटमारी करून दहशत दाखवून लुटमार करणारे ही दादा होण्याचे स्वप्न पाहत आहेत. तर काही तालुका स्तरांवर राजकीय वजन आणि पाठबळ असलेली मंडळी अशा मुलांना सोबत घेऊन मोठे दादा होऊन स्थानिक गुन्हेगारी विश्वात आपला वचक निर्माण करण्याचा आणि बैठक जमवण्याचा नव्या उद्योगात प्रयत्न करत आहेत.
…………………………………………………………………………….
🔺अल्पवयीन मुलांचे नशापाणी करण्याचे वाढलेले प्रमाण ही गुन्हेगारी विश्वात पदार्पण करायला सहाय्यभूत होत असल्याचे मत अनेक वडीलधारे आणि ज्येष्ठ मंडळींनी व्यक्त केले आहे. शहरातील मोकळ्या जागेत, मैदानावरील बाटल्याचा खच मॉर्निंग वॉक ची जेष्ठ पिढी पहाते आहेच. अनेक मारामारी मध्ये नशा केलेली मुले आढळून येतात. शहरातील अनेक ठिकाणी दारूच नाही तर अनेक मार्गाने नशा करण्याची गांजा, आणि पुण्या- मुंबई ची मादक द्रव्य या युवकांना सहजपणे उपलब्ध होतात. वाढत्या चोऱ्या, वाटमारी आणि गुन्हेगारी रोखण्याचे परळी तालुक्यातील तीनही पोलीस ठाण्यासमोर मोठे आव्हान जसे आहे, तसेच पोलीस प्रशासनाचा आणि कायद्याचा धाक जरब निर्माण करणेही गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
……………………………………………………………………..

🔺 शहरात आणि ग्रामीण भागात तीनही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरी गेलेल्या दुचाकी, चार चाकी गाड्यांची संख्या मोठी आहे. मृतदेह आढळण्याचे प्रमाण हे बरंच आहे. झुंड शाहीच्या मारामाऱ्या कमी-अधिक असल्या तरी मात्र या गुन्ह्याची उकल झाल्याचं आणि आरोपी ताब्यात घेतल्याचं अध्यापितो पोलिसांनी पत्र परिषद घेऊन सांगितल्याचं दिसून येत नाही.