महिला महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

बीड/परळी वैजनाथ-एम एन सी न्यूज नेटवर्क- शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या संचालिका तथा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे, माजी प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रा डॉ मनिषा रोकडे यांनी सावकरकर यांच्या जीवन कार्याच्या आढावा घेत असताना सांगितले की, सावरकर म्हणजे देशप्रेमाचे दुसरे नाव आहे. सावरकरांमध्ये देशभक्ती ठासून भरलेली होती. यावेळी प्रा डॉ मुंडे, प्राचार्या डॉ देशपांडे यांनी आपले मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा प्रविण फुटके यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.