विद्यावर्धिनी माध्यमिक विद्यालय परळी चे नेत्रदीपक यश

बीड/परळी वैजनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क  – मार्च 2024 मध्ये झालेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत विद्यावर्धिनी विद्यालय परळी वैजनाथ चा निकाल ९९.५७ टक्के लागला असून एकूण 236 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 118 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत व यापैकी 54 विद्यार्थ्यांनी 95 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. तसेच संस्कृत विषयात शंभर पैकी 100 गुण घेऊन घेणारे 27 विद्यार्थी तर गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण घेणारे चार विद्यार्थी आहेत.

यामध्ये (1)चि. वडुळकर आदित्य जगन्नाथ शंभर टक्के गुण घेऊन शाळेतून सर्वप्रथम (2) कु. मुंडे ऋषीता ज्ञानोबा 99.6% गुण घेऊन शाळेतून द्वितीय (3)कु. फड ऋतुजा नरहरी 99.40% गुण घेऊन शाळेतून तृतीय
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री काठोये साहेब (मुख्य अभियंता औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ) मा. श्री अवचार साहेब व श्री बनकर साहेब (उपमुख्य अभियंता औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ) मा. श्री राठोड साहेब (कल्याणधिकारी औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ) मा. श्री कनाके साहेब (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती परळी वैजनाथ) तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री कोळगे साहेब, उपाध्यक्ष मा श्री भिंगोरे साहेब, सचिव मा. श्री इटके साहेब, कोषाध्यक्ष मा. श्री पैंजणे साहेब, संचालक मंडळ मा. श्री एम टी मुंडे साहेब ,मा. श्री सावंत साहेब व मा.श्री चेवले साहेब तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री मातेकर सर व नीला सर (माध्यमिक) तसेच प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री नांदुरकर सर व श्री सुमठाणे सर व सर्व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.