तापमानात मोठी वाढ; सूर्याचा वाढतोय पारा

◾ निकालाच्या दिवशी घ्या काळजी

जिल्ह्याला मोठ्या उद्योग व्यवसायाची मोठी नितांत गरज आहे . ज्यामुळे जिल्ह्यातील युवकांना -युवतींना त्यातून रोजगार उपलब्ध होईल . उच्च आणि दर्जेदार तंत्रशिक्षण मिळालं तर एक उद्योजक पिढीही या जिल्ह्यात घडू शकते..  मात्र जय हो आणि समर्थन यातच जिल्ह्यातील युवक गुरफटला गेल्याचे एकूणच चित्र जिल्हाभरात दिसत आहे.

बीड/परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क : मे महिन्यात रणरणत्या उन्हाळ्यामध्ये लोकसभा निवडणुका लागल्या आणि जिल्ह्यातील वातावरण उन्हापेक्षाही अधिक तापून गेलं. कोणत्याही पक्षाने कुठल्याही विकासाचा मुद्दा समोर न ठेवता केवळ ते जातीपातीवर आणि विकासाच्या चर्चे शिवाय मतदारांपर्यंत नेले मतदान ही पार पडले. येत्या चार तारखेला जिल्ह्यातील निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. तापमान चाळिशी पार असलं तरी कार्यकर्त्यांनी आपल्या डोक्याचा पारा कमीच राहील याची काळजी घ्यावी अशीचं अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे.

नुकत्याच जिल्ह्यात लोकसभेच्या जागेसाठी मतदान पार पडलं . मात्र या निवडणुकीत दोन्हीही मुख्य उमेदवाराकडे कुठलाही विकासाचा मुद्दा समोर नव्हताच. जिल्ह्यातील किंबहुना तालुका भागातील औद्योगिक आणि शैक्षणिक विकास, उद्योगधंदे, आरोग्याच्या बेसिक सुविधा, उच्च आणि दर्जेदार तंत्रशिक्षणासाठी काही सोय अशा कुठल्याही गोष्टींचा या निवडणुकीला स्पर्श नव्हता. बस फक्त चालला तो एकच मुद्दा जात आणि जात.  जातिपातीवर चर्चा करत मतदान ही पार पडल आता येत्या ४  तारखेला निकालाचा दिवस आहे.

एकूणच जिल्हाभरात या जातीचा आणि त्या जातीचा असं म्हणून अनेक गावागावात भांडणे आणि गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेपर्यंत जिल्ह्यात नेमकं कसलं वातावरण राहील हे सांगणं कठीण आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्याला मोठ्या उद्योग व्यवसायाची मोठी नितांत गरज आहे ज्यामुळे जिल्ह्यातील युवकांना युवतींना त्यातून रोजगार उपलब्ध होईल उच्च आणि दर्जेदार तंत्रशिक्षण मिळालं तर एक उद्योजक पिढीही या जिल्ह्यात घडू शकते मात्र जय हो आणि समर्थन यातच जिल्ह्यातील युवक गुरफटला गेल्याचे एकूणच चित्र जिल्हाभरात दिसत आहे.

यांचा कट्टर कार्यकर्ता तर त्यांच्या समर्थक यावरून विविध समाज माध्यमावर उलट सुलट कॉमेंट्स करणे चालूच आहे यामधून दोन समाजातील वाद निवळण्या ऐवजी तो वाढीस लागण्याची मोठी चर्चा आहे.
…………………………………………
◾ डॉक्टरी सल्ला

उमेदवार कोणीही निवडून येईल तेव्हा अति तप्त उन्हात जल्लोषाला ही काही मर्यादा असाव्यात असं ज्येष्ठांचे म्हणणं आहे. एकूणच जूनच्या पहिल्या आठवड्यात तापमान 40°c पेक्षाही अधिक असण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे शरीराचे तापमान 104 च्या पुढे गेल्यास डॉक्टरच्या मते सरद एक वेळ उन्हात गेल्यास शरीर दोन उष्णता बाहेर पडण्याच्या गती पेक्षा उष्णता शरीरात प्रवेश करण्याची शक्यता अधिक असते तेव्हा शरीराचे तापमान 104 फॅरेनाईट पेक्षा जास्त गेल्यास लोक वाढून मृत्यू ही होऊ शकतो.
◾ निकालाच्या दिवशी उपाशीपोटी उन्हात जाऊ नये दरम्यान भरपूर पाणी घ्या, डोक्याला पांढरा रुमाल, टोपी, सन गॉगलचा वापर करावा. एसी गाडी तुन एकदम गरम उन्हात जाण्याचं प्रकर्षाने टाळा.
◾ खूप थकवा, अधिक घाम निघत असेल, तापही आला असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.