मी फिट तर कुटुंब फिट,कुटुंब फिट तर समाज समाज फिट तर माझा देश फिट’-मयुरी शिंदे

व्यायाम शिबिर/ विद्यार्थ्यांच्या भावना

🔶 व्यायाम शिबीर व संस्कार वर्ग कार्यक्रमात कु.मयुरी शिंदे हिचे वक्तव्य

बीड/परळी वैजनाथ– मी फिट तर कुटुंब फिट, कुटुंब फिट तर समाज, अन् समाज फिट तर माझा देश फिट असे उद्गार परभणी येथील क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थिनी कु.मयुरी अनंता शिंदे व्यक्त केले. हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने आयोजित उन्हाळी व्यायाम शिबीर व संस्कार वर्ग कार्यक्रमाचे 18 एप्रिल ते 19 मे दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परभणी येथून खास शिबीरात सहभागी झालेली विद्यार्थिनी कु.मयुरी अनंता शिंदे हि बोलत होती.

पुढे बोलतांना कु.मयुरी शिंदे हीने म्हटले की, माझ्या पालकांना परळी वैजनाथ येथील हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने आयोजित व्यायाम शिबीर व संस्कार वर्गाबाबत व्हॉॅट्सअप वर माहिती मिळाली व चौकशी करून प्रवेश मिळवला. या शिबिरातून मला जे काही शिकायला मिळाले ते माझ्या आयुष्यासाठी खूप अनमोल अशी शिदोरी मिळाली. ती शिदोरी आयुष्यभर जपून वापरणार आहे असे ती म्हणाली व शिबीर प्रमुख इटके गुरुजी, नाणेकर सर तसेच या शिबिरात शिकवणारे बालासाहेब हंगरगे पाटील व सर्वच शिक्षकांचे आभार मानले. हे शिबीर असेच कायमस्वरूपी चालू राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.

पुढे बोलतांना ती म्हणाली की, या शिबिराच्या काळात सकाळी तीन तास व संध्याकाळी तीन तास मुले मैदानात होते म्हणजे मोबाईल मुक्त वातावरणात व्यायाम करणे हे देशाची भावी पिढी घडवण्यासाठी खूप मोलाचे योगदान या शिबिरातून होत आहे. असे तिने सांगितले. एक दिवस फोटो पूरता कोणताही उपक्रम करणे म्हणजे ते साध्य करणे नसून, जीवन आनंद प्राप्त करणे किंवा त्याची साधना करणे हे आहे.प्रत्येकाची शरीर-रचना ही वेगवेगळ्या पद्धतीने तयार झालेले असते.त्यात दिनचर्या, जीवनपद्धती, आहार,आजूबाजूचे वातावरण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात.बाह्य शरीर व अंतर्मन या विशिष्ट घटनांमूळे आपण आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.

नविन नविन गोष्टी आत्मसात करणे ही आता सर्वांची गरज झाली आहे.त्या गरजेला योग्य खतपाणी घालणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.तुलनात्मक जगण्यापेक्षा मला कशात आनंद घेता येईल हे जास्त जरुरी आहे असेही सांगितले.