निशिगंधा वाघमारे दहावी परीक्षेत 90.40% गुण घेऊन उत्तीर्ण

🔷 शिक्षण/यश/कौतुक/अभिनंदन/

बीड/परळी वैजनाथ /येथील फाउंडेशन स्कूल मध्ये शिकणारी निशिगंधा राजन वाघमारे हिने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून तिला 90.40% गुण मिळाले आहेत. या यशाबद्दल तिचे कौतुक केले जात आहे.
बहुजन मोर्चाचे बीड जिल्हा महासचिव तथा दलित चळवळीतील नेते राजन वाघमारे यांची निशिगंधा ही मुलगी असून तिला दहावीच्या परीक्षेमध्ये 90.40% गुण मिळाले आहेत.

अतिशय मेहनतीने आणि प्रामाणिकपणे अभ्यास करून मिळालेल्या गुणांमुळे तिने समाधान व्यक्त केले असून तिच्या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक व नातेवाईकांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.