संग्रहित छायाचित्र
🔶रेल्वे चा मेगा ब्लॉक 🔶मेल-एक्सप्रेस वर परिणाम
🔺 उद्यापासून महा नगरी मुंबईत प्रवाशांचे हाल; सीएसएमटीचा ३६, तर ठाण्यात ६३ तासांचा ब्लॉक; ७२ मेल गाड्या आणि सुमारे ९३० लोकल फेऱ्यावर मोठा परिणाम.
मुंबई : २४ डब्यांच्या रेल्वे गाड्यांसाठी सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाकरिता शुक्रवारपासून ३६ तासांच्या ब्लॉक जाहीर झाला असतानाच मध्य रेल्वेने ठाणे स्थानकातही तब्बल ६३ तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. या दोन्ही ब्लॉकचा थेट परिणाम म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस तब्बल ९३० लोकल फेऱ्या आणि ७२ मेल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. याशिवाय अनेक मेल-एक्सप्रेस गाड्या दादर, ठाणे, पनवेल, नाशिक आणि पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील.
दरम्यान ठाणे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ५ आणि ६ रुंदीकरणासाठी शुक्रवारी मध्यरात्री १२.३० ते रविवारी २ जून दुपारी ३.३० वाजेपर्यंत कही महत्वाच्या मेल-एक्सप्रेस रेल्वेगाड्या ज्या सीएसएमटीकडे जातात त्या दादरमध्ये २२, ठाण्यात- २, पनवेल- ३, पुणे -५, आणि नाशिकमध्ये -१ शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. याच वेळे दरम्यान सीएसएमटी ऐवजी दादरवरून २० मेल-एक्सप्रेस, पनवेलहून -३, पुण्यातून -५ आणि नाशिकहून- १ गाडी सोडण्यात येणार आहे.
………………………………………………………………………….
🔶 वार/दिवस लोकल रद्द शॉर्ट टर्मिनेट
- शुक्रवारी १६१ ०७
- शनिवारी ५३४ ३०६
- रविवारी २३५ १३१
🔺 एकूण ९३० ४४४
मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द- शुक्रवार – ०४, शनिवार – ३७, रविवार -३१