एआयचे शिक्षण केरळ राज्याच्या पाठ्यपुस्तकांत

🔺शिक्षण🔺 पाठ्यपुस्तक 🔺अभ्यासक्रम

केरळ- वृत्तसंस्था | तिरुअनंतपुरम – आर्टीफिशियल इंटेलिजन्स (एआय) आपल्या आयुष्याचा भाग बनले आहे. परिणामी मुलांना याबाबत सांगणे गरजेचे आहे. केरळने शालेय अभ्यासक्रमात एआयचा समावेश केला आहे. आता इयत्ता सातवीतील विद्यार्थी त्यांच्या माहिती आणि संवाद तंत्रज्ञान विषयांतर्गत एआयचे शिक्षण घेतील.

या वर्षापासूनच ४ लाख मुले त्यांचा एआय प्रोग्राम तयार करतील. हा प्रोग्राम चेहऱ्यावरील हावभाव समजू शकेल, तथापि, आसामच्या एका खासगी शाळेने एआय शिक्षिक लाँच केली. पारंपारिक मेखला चादर व दागिने घातलेल्या एआय शिक्षिकेचे नाव आयरिस आहे. तिने वर्गातील मुलांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.