बमगोंडे, येदले, लांडे आणि भिसे यांना सेवानिवृत्ती निमित्ताने निरोप

वीज निर्मिती /औष्णिक वीज केंद्र
मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार 
बीड /परळी वैजनाथ -एम एन सी न्यूज नेटवर्क -औष्णिक विद्युत केंद्र परळी येथील  कोळसा हाताळणी विभाग संच क्र ८ चे उपकार्यकारी अभियंता सिद्राम गुरुपाद बमगोंडे, संचलन संच क्र ८ चे तंत्रज्ञ  ज्ञानोबा निवृत्ती येदले, तंत्रज्ञ -१ देविदास गणपतराव लांडे आणि  तंत्रज्ञ – २ भास्कर दादाराव भिसे  यांना दि ३१ मे  रोजी सायं ५ वा. प्रशासकीय कार्यालयातील सभागृहात सेवापूर्ती कार्यक्रमात  निरोप देण्यात आला. या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा  मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सविस्तर माहिती अशी की, या चौघांनी महानिर्मिती मध्ये सेवा दिली. या वेळी त्यांच्यावर बनवण्यात आलेल्या चित्रफीत दाखवण्यात आली. याप्रसंगी कर्मचारी भाउक झाले होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये हे होते.
या वेळी उपमुख्य अभियंता अमित बनकर, प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार, अधीक्षक अभियंता एस एन बुकतारे, धनंजय कोकाटे ,कार्यकारी अभियंता सुरेश गर्जे, कामगार नेते हरिराम गित्ते,  वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अरविंद येरणे,  कार्यकारी अभियंता मदन पवार,राजू गजले यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन के एच गित्ते मॅडम यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सहाय्यक कल्याणाधिकारी शरद राठोड यांनी मानले.