परळी फाऊंडेशन स्कूल  दहावीचा विशेष प्राविण्यासह १००% निकाल.

सलग २५ व्या वर्षी  फाऊंडेशन शाळा SSC निकालात अव्वल.

बीड/परळी वैजनाथ-एम एन सी न्यूज नेटवर्क –  शहरातील सतत शैक्षणिक प्रयोग करणारी शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली फाऊंडेशन शाळा.इयत्ता दहावीची सलग २५ वर्ष १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवणारी इंग्रजी माध्यमाची पहिली शाळा ठरली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये फाऊंडेशन शाळेच्या एकूण ८३ विद्यार्थ्यांनी दहावीची बोर्ड परीक्षा दिली होती .
त्यामध्ये सर्व विद्यार्थी अत्यंत गुणवत्तापूर्ण मार्क घेऊन उत्तीर्ण झाले असून. शाळेतील 35 विद्यार्थ्यांनी 90% च्यावर मार्क घेतले आहेत हे विशेष , तर 44 विद्यार्थ्यांनी 75% च्या वर मार्क घेऊन गुणवत्ता यादीत येण्याचा मान पटकावला आहे. तर शाळेतील 4 विद्यार्थी हे 60% च्या वर गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

शाळेचा अभिजीत बालासाहेब लोखंडे या विद्यार्थ्याने ९६. ८०% गुण घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
शाळेतून द्वितीय येण्याचा मान रणजित मोहन चाटे या विद्यार्थ्याला ९६.६०% मार्क मिळाल्यामुळे मिळाला आहे.
तर तृतीय येण्याचा बहुमान आदित्य भगवान राठोड या विद्यार्थ्याला ९६.४० % मिळून प्राप्त झाला आहे.
याचे सर्व श्रेय विद्यार्थी, पालक, विषयशिक्षक, शाळा प्रशासन, रेजोजन्स स्टाफ व प्राचार्य याना जाते असे मा.अध्यक्ष श्री विजयप्रकाशजी तोतला यांनी मत व्यक्त केले.