महात्मा फुले सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच शैक्षणिक, आर्थिक शिखर गाठता आले… मिलिंद घाडगे

शिक्षण /यश/गुणवत्ता 

बीड/परळी-वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क  तालुक्यातील टोकवाडी येथे वंचित बहुजन आघाडी शाखेच्या वतीने दहावी बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करताना मिलिंद घाडगे यांनी सांगितले की या देशांमध्ये एससी, एसटी ,ओबीसी, अल्पसंख्यांक यांना शिक्षणाची संधी नव्हती शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक ,सांस्कृतिक सर्वच पातळ्यावर बहिष्कृत असलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गावर व शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणारे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले हेच शिक्षणाचे खरे देवता आहेत. फुले दांपत्याच्या शैक्षणिक धोरणाला राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना समान शिक्षणाची सक्ती करून गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय ही सरकारची जिम्मेदारी आहे असा कायदाच करून बाबासाहेब आंबेडकरांनी या नाही रे वर्गाला सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीपथावर आणले या महामानवांचे योगदान आपल्याला नाकारता येणार नाही ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डात विशेष प्राविण्य मिळवले अशा विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यामध्ये खूप मोठे व्हावे तहसीलदार, कलेक्टर ,डॉक्टर, इंजिनिअर, हायकोर्ट ,सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांचे शैक्षणिक विचार तळागाळापर्यंत पोहोचवून गोरगरिबांना शिक्षणासाठी मदत करावी असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी तुकाराम महाराज मुंडे यांनी सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस मंगलमय शुभेच्छा व्यक्त केल्या वंचित आघाडीचे एजाज शेख यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात दहावी बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी कु. स्नेहल विष्णुपंत मुंडे, सोनाली प्रदीप मुंडे, प्राची पांडुरंग शिंदे ,समता बनसोडे, अश्विनी कांदे, आर्या गरजे, शामल संजय सर्वदे, वैभव शिंदे ,राहुल भगवान राजभोज ,सिद्धांत सोमनाथ रोडे, गणेश दयानंद गायकवाड या विद्यार्थ्यांचा वंचित बहुजन आघाडी शाखा टोकवाडी च्या वतीने मान सन्मान सत्कार करून गुणगौरव करण्यात आला याप्रसंगी वंचितचे जि. युवा उपाध्यक्ष साहेबराव रोडे, ता. युवा अध्यक्ष राजेश सरवदे, ता. उपाध्यक्ष सुभाष रोडे, ता. उपाध्यक्ष संतोष वावळे, नवनाथराव मुंडे ,शेख अलाउद्दीन ,प्रदीप रोडे ,पंढरीनाथ मुकुंद बनसोडे ,पांडुरंग शिंदे, संघर्ष वामन भावे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीपजी भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन माऊली मुंडे सर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला गावातील सर्व समाज बांधव महिला पुरुष प्रतिष्ठित व्यक्ती प्रचंड संख्येने उपस्थित होते