सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उत्तम अवचार सेवानिवृत्त

🔶 सेवानिवृत्ती/निरोप समारंभ

बीड/परळी वैजनाथ-एम एन सी न्यूज नेटवर्क-  रेल्वे पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उत्तम यमाजी अवचार हे दिनांक 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. अवचार यांना सेवानिवृत्ती निमित्त परळी रेल्वे ठाण्याच्या वतीने त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. याप्रसंगी रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

उत्तम यमाजी आवचार रेल्वे पोलीस स्टेशन परळी येथे सहा.पोलीस उप निरीक्षक या पदावर कार्यरत होते. दि. 31 मे 2024 रोजी नियतवयोमानानुसार सेवेचे 36 वर्षे पूर्ण सेवा करुन सेवा निवृत्त झाले. कधीही गैरहजर किंवा सिक रजा घेतलेली नाही. विशेष म्हणजे त्यांनी कर्तव्य बजावत निशकंलक सेवा करून ते सेवानिवृत्त झाले आहेत. उत्तम यमाजी अवचार यांना परळी रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने यथोचित सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी सहा.पोलीस निरिक्षक श्री परमेश्वर सोगे, पोलीस उपनिरीक्षक श्री साबळे,सहा.पो. उपनिरीक्षक सय्यद, हवालदार बाबासाहेब फड, हेमलता नागपुरे, गणेश जाधव, म.पो.अं .मोहीनी बिक्कड, सेवानिवृत्त अंमलदार आरबोने, राम तारडे आधीसह रेल्वे पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते.

🔺आपण रेल्वे पोलीस विभागात निष्कलंक सेवा केली हीच आपली यशाची गुरुकिल्ली असून रेल्वे विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मला नेहमीच चांगले सहकार्य केले आहे.
उत्तम यमाजी अवचार
सेवानिवृत्त सहा.पोलीस उप निरीक्षक