अनुदानित युरिया खताची विक्री; कारवाई करा : वसंत मुंडे

🔺कृषी विषक 🔺हवामान 🔺खाते बियाणे

बीड/परळी-वैजनाथ– शासनाकडून अनुदान घेऊन अनेक कंपन्या शेतकऱ्यांना खत पुरवठा करण्याऐवजी उद्योजकांना युरीया खत पुरवत आहेत. खरिपाच्या पेरणीपुर्वीच बाजारपेठेत युरीया खताची टंचाई निर्माण झाली आहे. याचे जाळे मंत्रालयापर्यंत पोहचले असल्याने याची सखोल चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली आहे.

शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी पेरणीसाठी युरिया खताची गरज मोठ्या प्रमाणावर लागते. परंतु पेरणीच्या वेळेसच अनुदानित युरिया खताची टंचाई निर्माण होते. कारण अनेक खासगी कंपन्या चोरून अनुदानित युरिया खताचा पुरवठा खाजगी उद्योगांना पुरवतात. त्यांचे मंत्रालया पासून कृषी खात्याच्या  वरिष्ठांशी आर्थिक व्यवहाराचे लागेबांधे असल्यामुळे युरिया खताची टंचाई निर्माण करून शेतकऱ्याला युरिया न मिळवू देणारे रॅकेट कार्यरत आहे. ही बाब केंद्र सरकारच्या लक्षात आल्यानंतरत्यानीं राज्य सरकारला सतर्क रहाण्याच्या सुचना केल्या, परंतु महाराष्ट्र राज्यातील कृषी विभागाच्या निविष्ठा गुण नियंत्रण दक्षता पथकाकडून राजकीय हस्तक्षेपा मुळे कारवाई होत नाही.