विवाहितेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पती, सासूवर गुन्हा

🔺नवविवाहितास त्रास

बीड /परळी- वैजनाथ–  शहरातील जुन्या भागात असलेल्या धनगर गल्ली परिसरात वीसवर्षीय विवाहितेस रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जयश्री गणेश फुके (वय २०) या विवाहित महिलेचा सासरच्या मंडळींकडून वारंवार शारीरिक व मानसिक छळ होत होता.

यातच १ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सासू आणि नवऱ्याने जयश्री हिच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान जयश्री फुके हिने संभाजीनगर पोलिसात जबाब दिला. यावरुन संभाजीनगर पोलिस ठाण्यात पती गणेश जगन्नाथ फुके व सासू वंदना जगन्नाथ फुके यांच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.