रस्त्यावर कडेला असलेल्या खड्ड्यात कपडे धुताना १ मुलीचा मृत्यूः,

🔺दुर्दैवी घटना
🔷 नागरिकांच्या मदतीने तीन मुलीं वाचल्या.

पुणे – दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते कामासाठीच्या झालेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठवून राहिले होते. परिसरातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर इस्कॉन मंदिरासमोर रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याच्या कडेला झालेल्या या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्यामध्ये कपडे धुण्यासाठी उतरलेल्या एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून तिच्या सोबतच असलेल्या तीन मुलींना वाचवण्यात यश आले आहे.

सदर घटनेत मृत झालेल्या मुलीचं नाव मुस्कान शिलावत (१६) असल्याची माहिती मिळाली असून. सरगम जगदीश शिलावत (१५), जणूबाई रमेश शिलावत (१६) आणि तेजल जगदीश शिलावत (१२) या मुली जखमी झाल्या आहेत. शिलावत कुटुंब मागील चार महिन्यांपासून कोंढवा परिसरात राहण्यासाठी आले आहे. चाकू- सुरी अशा घरातील वापराच्या वस्तूंना धार लावणे आणि चादर विक्री अशी कामे करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. या परिसरात रस्त्याचे काम सुरू असून या ठिकाणी ग्रेड सेप्रेटरच्या कामासाठी रस्त्याच्या कडेला खड्डा खोदण्यात आलेला आहे.

पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेल्या या खड्यात. शनिवारी चौघीही कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मुस्कानची चप्पल पाण्यात पडल्याने ती काढण्यासाठी ती गेली असता ती पाण्यात बुडाली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर तिघीही पाण्यात उतरल्या. त्यांच्या आराडाओरडीमुळे नागरिकांनी तिघींना बाहेर काढले.