लोकसभा तो झांकी थी,विधानसभा अभी बाकी है- फुलचंद कराड

🔺80 % खासदार निवडुन आणणारे शरदचंद्र पवार एकमेव नेते
बीड/परळी-वैजनाथ – बीड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जेष्ठ नेते फुलचंद कराड यांनी लोकसभा तो झांकी थी,विधानसभा अभी बाकी है असे सांगत विजयाचे गणित मांडताना महाराष्ट्राच्या इतिहासात 80 % टक्के जागा निवडुन आणणारे शरदचंद्र पवार हे एकमेव नेते असल्याचे सांगितले.बंजरंग बप्पांच्या विजयामुळे फुलचंद कराड व त्या पक्षाच्या उमेदवाराचा लोकसभा बीड लोकसभा मतदार संघातील विजय हे गणित या निवडणुकीतही कायम राहिल्याचे दिसुन आले.
बीड लोकसभा मतदार मतदार संघातु कॉंग्रेस, शिवसेना(उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना जेष्ठ नेते  फुलचंद कराड म्हणाले की मी राजकारणात कधीच एका व्यक्तीला अथवा समाजाला विरोध केलेला नाही.राजकारण करत असताना संत भगवानबाबा यांच्या नावाने भगवानसेना ही संघटना काढुन बाबांचा फिरता नारळी सप्ताह घेतला.माझ्या सर्व संस्थांना भगवानबाबांचे नाव देत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम करत आहे. मला माझा पुर्वीचा पक्ष सोडण्याची वेळ मुंडे बहिण-भावाने आणली.सध्या माझ्याबाबत वंजारी समाजात गैरसमज पसरवण्यात येत असले तरी गत लोकसभा निवडणुकीत प्रितम मुंडे यांच्या विरोधात भाऊ धनंजय मुंडे यांनी त्यावेळी बजरंग बप्पाचे काम केले मग आता मी काय देशद्रोह केला की काय? विकासाच्या मुद्यापासुन भरकटवण्यासाठी बहीण-भावाची ही खेळी असुन त्यांना गरज पडल्यावरच समाज आठवतो.मी माझे राजकारण स्वतःची शेती विकुण करत असुन या निवडणुकीत परळी विधानसभा मतदार संघात आमची ताकद काय हे विरोधकांच्या लक्षात आले असेल.या निवडणुकीत अंबाजोगाई येथील सभेत पवार साहेबांसमोर आपल्या पक्षाला 100 % यश मिळेल असे सांगितले होते.या निवडणुकीत बप्पांचा विजय साडेसहा हजाराच्या मताधिक्याने झाला असला तरी हा विजय साठ हजार मतांचा आहे.मुंडे बहिण- भावाने सुडाचे राजकारण बंद करावे अन्यथा आगामी काळात होणार्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका व विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांना पुन्हा धक्का देवु असे फुलचंद कराड यांनी यांनी सांगितले.
🔷 फुलचंद कराड आणी विजय हे समिकरण कायम
 गत वीस वर्षांपासुन फुलचंद कराड हे बीड जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत.ज्या पक्षात असतील त्यांचे इमानेईतबारे काम करत त्या उमेदवाराच्या विजयात मोठा वाटा उचलला आहे.2004 पासुन बीड लोकसभा मतदार संघात फुलचंद कराड आणी त्या पक्षाचा उमेदवार विजयी हे समिकरण या निवडणुकीत बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या विजयाने कायम राहिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत फुलचंद कराड यांच्या नेतृत्वगुणाची छाप दिसणार आहे.