🔺सामाजिक 🔺आर्थिक विकास 🔺महामंडळे
बीड/परळी -वैजनाथ – शहरातील आर्य वैश्य(कोमटी) आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती जिल्हा बीड यांची संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष श्री राजेश कौलवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
या बैठकीत संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री राजेश कौलवार यांनी आर्थिक विकास महामंडळाची ध्येय व धोरणे तसेच विकास महामंडळाची आवश्यकता उपस्थित समाज बांधवांना समजावून सांगितली.
प्रत्येक जिल्ह्यातील संघर्ष समिती मार्फत शासन दरबारी पाठपुरावा करून विकास महामंडळ पदरात पाडून घेऊन आपल्या समाजातील गरजू व्यक्तींना त्याचा निश्चितच फायदा होईल. आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीच्या बैठकीत खालील नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली व वेळोवेळी विकास महामंडळ संघर्ष समितीच्या बैठकी साठी उपस्थित राहून इतर तालुक्यातील समाज बांधवांना या संघर्ष समितीमध्ये सहभागी करून घेण्याचे ठरले.
बीड जिल्हा संघर्ष समिती कार्यकारिणी अध्यक्ष श्री राजेश कोलवार, मार्गदर्शक: नागनाथ पारसेवार,
रमाकांत कौलवार, सचिव: रमेश कोमावार उपाध्यक्ष: विवेक पारसेवार, गोविंद पेटेवार सदस्य: नंदकिशोर डुबे, अनिल रुद्रवार, राघवेंद्र गडगुळ, अनिल बोतकुलवार स्वप्निल गडम आदी उपस्थित होते.