🔺माध्यमसम्राट/चित्रपट निर्माते
हैदराबाद (तेलंगणा) : माध्यम व चित्रपट क्षेत्रातील अग्रगण्य समूह असलेल्या रामोजी ग्रुपचे सर्वेसर्वा चेरुकुरी रामोजी राव यांच्या पार्थिवावर रविवारी तेलंगणाच्या हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटी येथे पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राव यांचा मुलगा किरण याने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. रामोजी राव यांचे शनिवारी सकाळी हैदराबाद येथे रुग्णालयात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. २०१६ साली त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते.
राव यांच्या निधनामुळे आंध्र प्रदेश सरकारने ९ आणि १० जून रोजी राज्य शोक पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे.
