वाढणारा पाऊस कोकण रेल्वे मार्गावरील वेग मंदावणार

🔶 पावसाळी वेळापत्रक-  कोकण रेल्वे 🔺मुसळधार पाऊस

या गाड्यांच्या वेळेत कमी अधिक बदल 🔺कोकण कन्या एक्स्प्रेस, 🔺वंदे भारत, 🔺मडगाव- मुंबई मांडवी एक्स्प्रेस, 🔺मडगाव-मुंबई जनशताब्दी 

मुंबई : चालू पाऊस काळात मुसळधार पाऊस आणि दरडींचा धोका लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांसाठी सोमवारपासून पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. हे वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार असून, गाड्यांचा वेगही मंदावणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार गाड्या अर्धा ते एक तास लवकर धावणार आहेत.

पावसाळी वेळापत्रक  जून ते ऑक्टोबर या कालावधीसाठी गाड्यांसाठी  आखले जाते. कोकण रेल्वे मार्गावर धावणारी तेजस एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून ३ दिवस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान धावणारी एक्स्प्रेस आठवड्यातून दोनच दिवस चालविण्यात येते. कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस, वंदे भारत, मडगाव- मुंबई मांडवी एक्स्प्रेस, मडगाव-मुंबई जनशताब्दी या गाड्या अर्धा ते एक तार्स लवकर धावणार आहेत.