
◾ वनामध्ये पाणी आणि अन्न याची अडचण तर शहरा नजीक मोठ्या प्रदूषणात अडकला राष्ट्रीय पक्षी मोर
बीड- परळी वैजनाथ– शहरानजीक नंदागौळ, चांदापूर, घाटनांदुर, किंवा परळी परिसरातील बालाघाटाच्या डोंगर रंगात अनेक मोरांचं वास्तव आहे. मात्र तीव्र उन्हामुळे आणि अन्नाच्या कमतरतेमुळे हे मोर आता शहरानजीक असलेल्या नंदागौळ रस्त्यावरील नगरपरिषदेच्या कचरा डंपिंग ग्राउंड वर दिसून येत आहेत. गुरुवारी पहाटे मॉर्निंग वॉकला गेल्यावर टिपलेले हे छायाचित्र
परळी आणि परिसरातील बालाघाटाच्या डोंगर रागांमध्ये असंख्य वन्य जीव राहतात. यात सर्वाधिक संख्या मोरांचे असून मेरूगिरी पर्वता नजीक आणि नंदाघोळ मार्गावरील डोंगर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात मोर आहेत. मात्र वनातील पाणीसाठे आणि खाद्यान्न कमी झाल्यामुळे ते शहराच्या दिशेने येत असून नंदागौळ मार्गावरील कचरा डम्पिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात मोर दिसत आहेत. मात्र येथे साठवलेल्या कचराही बराच वेळा पेटून दिला जातो त्यामुळे अनेक मोर जखमी झाल्याचे हे दिसून आलं आहे. या कचरा ग्राउंड वर जाळलेल्या प्लास्टिक आणि तत्सम विषारी कचऱ्यामुळे येथे येणारे पक्षी जायबंदी होत आहेत.
छायाचित्रात कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात विषारी धूर ही निघताना दिसत आहे. पाणी आणि अन्नाचे शोधात आलेले हे मोर जळालेल्या प्लास्टिक मध्ये पाय चिटकून जखमी होत आहेत. वन्य प्राण्यांसाठी जलदुर्भिक्ष आणि वनवा याची भीती असतेच मात्र जंगल सोडून मोर शहरा नजीक येत असून येथे येऊनही त्यांच्या अडचणीत वाढत होत आहे. यंदाच्या प्रचंड प्रमाणातील उन्हामुळे जंगल भागातील नैसर्गिक जलसाठे पूर्णपणे नष्ट झाले आहेत. परळी -नंदागौळ, परळी -अंबाजोगाई आणि परळी -घाटनांदुर रेल्वे मार्ग किंवा रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात मोर पहाटे आणि सायंकाळचे सुमारास दिसून येतात.
शहरातील मॉर्निंग वॉक साठी पहाटे फिरायला जाणाऱ्या अनेक ग्रुप मधून मेरु गिरी पर्वतांनजीक आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूस अनेक नागरिक सकाळी पक्षांसाठी खाद्यान्न आणि पाणीही घेऊन जाऊन त्यांची सोय करत आहेत.
◾वनभागात तात्पुरते अनैसर्गिक जलसाठे गरजेचे
तीव्र उन्हाळ्याच्या काळामध्ये नैसर्गिक जलसाठे कोरडे पडत असल्याने येथे नैसर्गिक पणे पक्षांच्या पाण्याची सोय व्हावी असे जलसाठे करणे अत्यंत गरजेचे आहे.या सोबतच वन विभागानेही डोंगर रांगांमध्ये चर खोदून उन्हाळ्याचे किमान चार महिने पुरेल एवढ्या आकाराचे कृत्रिम का होईना पानवटे तयार करावेत अशीही पक्षी प्रेमी नागरिकांची मागणी आहे.
◾परळी परिसरातील मोरांची गणना नाहीच
बीड जिल्ह्यात बीड -पाटोदा मार्गावर नायगाव येथे मयूर अभयारण्य विकसित झाले आहे. येथेही मोरांची गणना केल्याचे एकीवात नाही. पण राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची जिल्ह्यात गनणा व्हावी त्यांचं टॅगिंग व्हावं अशी ही पक्षी प्रेमी नागरिकांची मागणी आहे.

