सेन्सेक्सचा पुन्हा उच्चांक घसरणीसह ७६,४९० अंकांवर स्थिरावला
मुंबई- : निवडणूक निकाल आणि त्यांतर मोदीची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. निदकला दरम्यान कोसळलेला शेयर बाजार आता स्थिरावतो आहे. लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बाजारात घसरण आता संपत आहे.
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी, सोमवारी बाजार ३८६ अंकांनी वाढून आजवरचा सार्वकालिक ७७,०७९ अंकांचा उच्चांक गाठला होता. निफ्टीनेही १२१ अंकांची उसळी घेत २३,४११ अंकांची विक्रमी झेप घेतली होती. दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स २०३ अंकांच्या घसरणीसह ७६,४९० अंकांवर स्थिरावला, तर निफ्टी ३० अंकांनी घसरून २३,२५९ वर स्थिर झाला. गेल्या चार दिवसात बाजार ५००० अंकांनी वाढला आहे.