मुंबई चा पाऊस
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने रविवारपासून हजेरी लावायला सुरुवात केली. त्यामुळे रविवार सकाळी ८.३० ते सोमवार सकाळी ८.३० या १२ वा तासांच्या काळात शहरात ४०.६० मिमी पावसाची नोंद झाली, अशी माहिती आपत्ती नियंत्रण व्यवस्थापन कक्षाने दिली.
रविवारची सकाळ अल्हाददायक अशा पावसाने झाली. सकाळी ९.३० ते १०.३० या एक तासाच्या कालावधीत
सुमारे १.२६ मिमी पाऊस झाला. सुट्टीचा दिवस असल्याने नागरिकाणी पावसाचा आनंद घेण्याची तयारी सुरू झालेली
ना असताना सकाळी १०.३० च्या सुमारास पावसाने दडी मारली.
पाऊस पडल्यामुळे काही काळ हवेत गारवा निर्माण झाला होता. मात्र नंतर पडलेल्या उन्हामुळे पुन्हा नागरिक उकाड्याने त्रस्त झाले. रविवारी रात्री साधारण ११.३० च्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली.त्यामुळे ९.९१ मिमी
पावसाची नोंद झाली.
दरम्यान रात्री ११.३० ते १२.३० च्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने केवळ एक तासात तब्बल २५.४० मिमी
पावसाची नोंद झाली. पहाटे ५.३० नंतर पावसाच्या तुरळक सरी पडत राहिल्या. गेल्यावर्षापेक्षा यंदा शहरात १ जून ते १० जून या कालावधीत चांगलाच पाऊस झाला