गावकऱ्यांची एकच पुकार एचआयव्ही/एड्स हद्दपार!

🔺 आरोग्य🔺एच आय व्ही तपासणी

बीड/परळी-वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क- तालुक्यातील खोडवा सावरगाव येथे (दि. 12) रोजी जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक कक्ष जिल्हा रुग्णालय बीड व  वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय परळी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आयसीटीसी विभाग उपजिल्हा रुग्णालय परळी वै. व लिंक वर्कर प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने गावातील जिल्हा परिषद शाळेत एच आय व्ही जनजागृती व तपासणी शिबिर घेण्यात आले.
 या शिबिरात प्रथम समुपदेशक श्री शरद चव्हाण यांनी ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांना एच आय व्ही /एड्स ,टीबी गुप्तरोग या आजारांची सविस्तर माहिती दिली त्यानंतर आईसी वाटप करण्यात आली व नंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री अमोल गालफाडे यांनी गावकऱ्यांची रक्त तपासणी केली, आजच्या शिबिरात एकूण 62 गावकऱ्यांची एच आय व्ही तपासणी करण्यात आली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी लिंक वर्कर प्रकल्पाचे पाईक सर, पियर शाहिन मॅडम, लता आघाव व खो. सावरगाव येथील आशा वर्कर अंगणवाडी मदतनीस सेविका यांनी मोलाचे सहकार्य केले