🔷 रेझोनन्स आता परळी शहरात
🔶विद्यार्थी व पालकांनी फाउंडेशन येथील रेझोनन्स मध्ये प्रवेश निश्चित करावा
बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क:-रेझोनन्स राजस्थान कोटा येथील NEET व JEE (Main + Advance) सारख्या परीक्षेची तयारी करून विद्यार्थ्यांचे करिअर घडविणारी सर्वोत्कृष्ट संस्था आहे. सन 2006 पासून देशभरात नावलौकिक असलेल्या रेझोनन्स या संस्थेने विद्यार्थ्यांसाठी Pre- Foundation Career Care Program (PCCP) प्रोग्रॅम चालू करून JEE (Main + Advance) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देशभरात केंद्र शाखा चालू केल्या. परळीच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती केलेल्या फाउंडेशन स्कूल येथे मराठवाड्यात प्रथमच सन 2022 मध्ये रेसोनन्सचे अधिकृत केंद्र चालू केले. परळी व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी फाउंडेशन स्कूल येथे आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयप्रकाशजी तोतला यांनी केले आहे.
या केंद्राच्या माध्यमातून राजस्थान कोटा येथील Resonance Academy मध्ये चालणारेच शिक्षण व शिक्षण पद्धती फाउंडेशन स्कूल येथील केंद्रात चालत आहे. हा PCCP Program सकाळच्या सत्रात रेझो सुपर बॅच माध्मातून व सायंकाळच्या सत्रात परिसरातील इतर शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी Evening Classes च्या माध्यमातून चालवला जातो. यामध्ये इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी PCCP Sub-Junior Classes व इयत्ता नववीच्या व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी Junior Classes अशा बॅचेस असून Junior Classes साठी (NMTC) National Mathematics Talent Competitions Scholarship, Olympiad व स्पर्धा परीक्षेची तयारी ही CBSE च्या अभ्यासक्रमातून NCERT चा अभ्यासक्रमाच्या आधारे केली जाते. सायंकाळच्या वर्गाची नविन बेंच दि. 18/06/2024 पासून सुरु होत आहेत.
इयत्ता 9 वी व 10 वी च्या जुनियर क्लासेस साठी NSEJS, IJSO सारख्या स्पर्धा परीक्षा व CBSE, State Board इत्यादी बोर्ड परीक्षेची तयारी करत JEE व NEET साठी ची विशेष तयारी केली जाते याचेच फलित म्हणून सेंटरमध्ये शिक्षण घेणारे फाउंडेशन स्कूलच्या एकूण 32 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा 2023- 24 मध्ये पात्र ठरले व इयत्ता 10 वीचे फाउंडेशन स्कूलचे 35 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले तर एकूण 44 विद्यार्थी 75 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले असून चार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तसेच सेंटरमध्ये शिक्षण घेणारे फाउंडेशन स्कूलचे व इतर शाळेचे बरेच विद्यार्थी शाहू स्क्रीनिंग टेस्टमध्ये निवडल्या गेले कारण या वर्गामध्ये शिकविण्यासाठी रेसोनन्स कोटा येथील प्रशिक्षीत शिक्षकच विद्यार्थ्याना शिकवितात.
याबद्दल रेझोनन्स सेंटर हेड असलेले संदीप यादव यांनी परळी पंचक्रोशीत राजस्थान येथील शिक्षणासारखी शिक्षण प्रणाली राबवून परळी शहराचे नाव देशपातळीवर नेण्यासाठी अतोनात परिश्रम करू असे आश्वासन देत परळी शहरातील शिक्षण पद्धतीचा चेहरा मोहरा बदलू असे ठाम मत व्यक्त केले. याच गोष्टीला संमती देत परळी पंचक्रोशीतील विद्यार्थी व पालकांनी फाउंडेशन येथील रेझोनन्स मध्ये प्रवेश घेऊन आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन फाउंडेशन स्कूलचे प्राचार्य व संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयप्रकाशजी तोतला यांनी केले.
🔶फाउंडेशन स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश🔶
फाउंडेशन स्कूलच्या एकूण 32 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा 2023- 24 मध्ये पात्र ठरले व इयत्ता 10 वीचे फाउंडेशन स्कूलचे 35 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 44 विद्यार्थी 75 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले असून चार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले
🔷 पालक व विद्यार्थ्यांनी संपर्क करावा
अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी रेसोनन्स सेंटर हेड श्री. संदीप यादव सर मो क्र. 9521878044 व श्री. दत्ता नरहारे सर (प्राचार्य, माध्यमिक) मो. क्र. 9325905051 तसेच श्री. गजानन नागझरे सर (प्राचार्य, प्राथमिक) मो. क्र. 7620072002 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

