🔷 अतिरिक्त अर्थसंकल्प
मुंबई– राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै या कालावधीत मुंबईत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.
नुकतीच विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या वेळी अधिवेशनातचर्चा करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्ह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.

