पत्नी व २ मुल जखमी होण्यापासून बचावली
अमरावती- राज्यात पतंग बाजी साठी बंदी असलेला धोकादायक मांजा वापरास बंदी असली तरी तो विकला जातो. याच मांजा मुळे बडनेरालगत असलेल्या अंजनगाव बारी येथे लग्नासाठी अकोल्यावरून दुचाकीने येणाऱ्या २९ वर्षीय तरुणाचा मांजाने गळा चिरलागेला. तो दुचाकीवर पत्नी व दोन मुलांसह जात होता. गंभीर दुखापत होऊनही त्याने चालवत असलेली दुचाकी खाली पडू दिली नाही, त्यामुळे पत्नी व मुलांना दुखापत झाली नाही. मात्र त्या तरुणाचा जीव गेला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली.
शुभम रामेश्वर विल्हेवार (२९, रा. कृषीनगर, अकोला) असे मृताचे नाव आहे. तो पत्नी व २ मुलांसह – अकोल्याहून लग्न सोहळ्यासाठी – अंजनगाव बारी येथे दुचाकीने येत होता. ७ ते ८ किमी अंतरावर असताना बडनेरा ते अमरावती एक्सप्रेस – हायवेवर मांजाने शुभमचा गळा चिरला. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होऊन शुभमचा मृत्यू झाला.