सोमवारी बकरी ईद; शांतता समिती बैठक संपन्न

🔺सोमवारी बकरी ईद

बीड | बकरी ईद सोमवार १७ जून रोजी आहे. हा सण शांततेत पार पडावा यासाठी प्रशासन सज्ज आहे आणि पोलीस दलानेही याची सर्व तयारी केली आहे. या उ सणासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी केले आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, परिक्षाविधीन जिल्हाधिकारी अर्पिता यांच्यासह अनेक अधिकारी यादरम्यान उपस्थित होते.