एनसीईआरटीच्या ६५ जागांसाठी थेट मुलाखती

🔷 १८ जूनपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात

बीड– नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग च्या जागा भरती साठी थेट मुलाखतीच्या आधारावर – उमेदवाराची निवड केली जाणार आहे. या जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. विविध पदांच्या ६५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पीएबी, पीसीबी प्रकल्पांतर्गत ही सर्व पदे भरली जाणार आहेत. या रिक्त – पदांच्या भरतीसाठी कोणत्याही – प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. या जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती १ मार्च २०२५ पर्यंत केली जाईल.

या भरतीसाठी एनसीईआरटीने वरिष्ठ तांत्रिक सल्लागार, तांत्रिक सल्लागार, वरिष्ठ सल्लागार शैक्षणिक, एआय तज्ज्ञ, वरिष्ठ प्रोग्रामर यांसह विविध पदांसाठी ६५ रिक्त जागांवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र व इच्छुक असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट ncert.nic.in द्वारे अर्ज करू शकतात. १८ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या पदांवर नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. त्या वेळी उमेदवाराने सर्व मूळ प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. वरिष्ठ तांत्रिक सल्लागार पदासाठी दरमहा ७५ हजार रुपये वेतन आहे, तर तांत्रिक सल्लागार पदाचे वेतन दरमहा ६० हजार रुपये आहे.