नवी मुंबईत १ कोटीचा गांजा पकडला

नशा खोरी, ड्रग,

🔺उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

मुंबई– नशा आणि नाश उत्पन्न करणाऱ्या ड्रग आणि ईतर पदार्थ निर्माण करणाऱ्या अनेकांवर मागील काही दिवसांत मोठी कारवाई करण्यात आली होती. परंतु नवी मुंबईत एका कारमधून तब्बल १ कोटीचा ४१४ किलो गांजा पकडला. या वेळी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी उत्पादन शुल्क विभागाच्या उड्डाण पथकाने तळोजा येथे ही कारवाई केली.

या कारवाईची पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शहरांत गांजा विक्रीसाठी चार चाकीतून संशयित येणार असल्याचे खबरीवरून पोलीसांनी कारवाई करत आरिफ झाकीर शेख (२५) आणि परवेझ बाबुअली शेख याना ताब्यात घेतले. २ जण गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार विभागाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेऊन गांजा जप्त केला. पोलिस अधिक तपास करत आहेत