सांगली जिल्हा बँकेचे ५० कोटींचे नुकसान ; आजी -माजी संचालकांना नोटिसा

जिल्हा मध्यवर्ती बँक /फसवणूक/ आर्थिक 

सांगली -जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मागील संचालक मंडळ कार्यकाळात बँकेचे सुमारे ५०.५८ कोटीं रुपयांचे चे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बँकेच्या आजी- माजी संचालक व अधिकाऱ्यांसह ४१ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

याबाबत २७ जून रोजी म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. चौकशी अधिकारी तथा कोल्हापूर शहरी उपनिबंधक डॉ. प्रिया दळणकर यांनी या नोटीस बजावल्या आहेत. जिल्हा बँकेत मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या काही निर्णयाबाबत सहकार आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली.