मान्सूनची वाटचाल राज्यात मंदावली

हवामान /मान्सून /पर्जन्य

१६ ते १९ जून दरम्यान यलो अलर्ट असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा.

पुणे : मे महिन्याच्या अखेरीस दक्षिण भारतात केरळ मध्ये  मान्सून दाखल झाला होता. बंगालच्या उपसागर, अरबी समुद्रावरून मान्सूनची वाटचाल थांबली आहे. मान्सूनच्या पुढील मार्गाकर्मास अनुकूल वातावरण झाल्यास पुढील तीन ते चार दिवसांत महाराष्ट्राचा राहिलेला भागात मान्सून पोहचेल आस अंदाज  आहे. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे.

दरम्यान  ६ जून रोजी महाराष्ट्रात मान्सून आगमन झाले. ८ जून रोजी पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागांतदेखील
मान्सून पोहोचला होता. त्यानंतर मान्सूनने मुंबईसह ठाणे, पुणे, नगर, बीड, डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
मजल मारली. पश्चिम विदर्भाच्या  काही भागांत मान्सून पोहोचला असून  अध्यापही  विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये
पाऊस  पोहोचला नाही. येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांसह छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि वायव्य बंगालच्या उपसागरात पश्चिम बंगाल, बिहारचा काही भाग, तसेच उप हिमालय, पश्चिम
बंगालच्या उर्वरित भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली.