सरकारी यंत्रणा जागी झाली; डोंबिवलीतील ४२ कंपन्या बंद करण्याचे आदेश

केमिकल कंपनी स्फोट प्रकरण 

मुंबई – डोंबिवली : रासायनिक कंपनी मध्ये गेल्या काळात  इंडो अमाइन्स व मालदे या दोन कंपन्यांना आग लागल्याने
संपूर्ण डोंबिवली पुन्हा हादरली एका महिन्यात लागोपाठ या दोन दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनास  जाग आली आहे.  महिनाभरात डोंबिवली एमआयडीसीमधील दोन रासायनिक कंपन्यांना आग लागून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १७
जणांना जीव गमवावा लागला आहे.

स्थानिक नागरिकांनी केमिकल कंपन्यांचे अन्यत्र स्थलांतर करण्याची यापूर्वीच मागणी केली आहे. त्यानुसार राज्य शासनाने व स्थानिक प्रशासनाने पावले उचलली असून डोंबिवली एमआयडीसीमधील आतापर्यंत ४२ रासायनिक  कंपन्या बंद करण्याचे
आदेश राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून देण्यात आले आहेत. सुमारे ४५० कारखाने डोंबिवली एमआयडीसीमध्ये असून त्यातील १८० रसायन कंपन्या आहेत. सुमारे ८ वर्षांपूर्वी याच भागातील प्रोबेस कंपनीत स्फोट होऊन त्यामध्ये १२ जण मृत्युमुखी पडले, तर २०० जण जखमी झाले होते. त्या घटनेतदेखील तीव्र स्वरूपाच्या स्फोटामुळे अनेक इमारतींचे व मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

सततच्या अपघात आणि मृत्युच्या  या घटनेमुळे  डोंबिवली  एम आय डि सी येथील कंपन्या अन्यत्र हलवण्याची मागणी पुढे आली. मात्र कंपनी मालकांच्या विरोधाला स्थानिक राजकीय नेत्यांनी बळ दिल्याने जनतेची मागणी मागे पडली. मात्र ८ वर्षांनंतर अनुदान कंपनीतील स्फोटात प्रोबेसची पुनरावृत्ती झाली. तब्बल १७ जण मृत्युमुखी पडले, तर ६५ जण जखमी झाले. तीव्र स्वरूपाच्या स्फोटामुळे अनेक कंपन्या, इमारती आदी मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
प्रथम नागरिक आणि  नागरी मालमत्ता सुरक्षेला प्राधान्य देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील धोकादायक रासायनिक
कारखाने अन्यत्र हलवण्यात येतील, अशी घोषणा केली.