इंडिगो आणि स्टार एअर ,लवकरच बेंगलरू-नागपूर-नांदेड-पुणे विमानसेवा

🔶 बेंगलरू-नागपूर-नांदेड-पुणे विमानसेवा  🔷 आठवड्यात चार दिवस विमानसेवा.

नागपूर -येत्या २७ जूनपासून स्टार एअरद्वारे नागपूर ते नांदेड ही विमानसेवा सुरू करण्यात येत आहे. हे विमान नागपूरहून आठवड्यातून चार दिवस सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी ९.१५ वाजता निघून नांदेडला सकाळी १०.०५ वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे नांदेडहून दुपारी दीड वाजता विमान उड्डाण करून दुपारी तीन वाजता नागपूरला पोहोचेल. सध्या स्टार एअरद्वारे अजमेर आणि बेळगावसाठी विमानसेवा सुरू आहे. त्यानंतर आता नागपूर-नांदेड ही विमानसेवा सुरू होत आहे.

ही विमान सेवा सुमारे ७६ सिट असून त्यात १२ बिझनेस आणि ६४ इकॉनॉमी क्लासच्या सिट आहे. तिकीट दर सध्यातरी सुमारें तीन हजार पाचशे  राहिल. हे विमान बंगळुरूहून नागपुरला येईल. नागपुरहून नांदेडला जाईल. नांदेडहून पुण्याला. पुण्याहून परत नांदेड आणि नांदेडहून परत नागपूर व येथूत बंगळुरू अशा फेऱ्या

नागपूर -नांदेड -संभाजी नगर अशी विमान सेवा  इंडिगो एअरलाइन्स द्वारे सुरू होत असून ती साधारणपणे पुढील महिन्यात २ जुलैपासून होण्याची शक्यता आहे. आठवड्यातून दोन दिवस म्हणजे मंगळवार आणि गुरुवार उड्डाण ही विमानसेवा सुरू राहील.  मराठवाड्यातील संभाजी नगर आणि नांदेड अशा दोन मुख्य शहरांशी नागपूर साठी  जलदगतीने संपर्क होईल.