मुख्य अभियंतापदी सुनिल इंगळे तर डॉ अनिल काठोये यांची मुंबईत झाली बदली

औष्णिक वीज  केंद्र-वीज निर्मिती

बीड/परळी वैजनाथएम एन सी न्यूज नेटवर्क – शहरातील औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये यांची बदली मुंबई येथे झाली असून त्यांच्या जागी उरण येथील  मुख्य अभियंता या पदावर कार्यरत असलेले. मुख्य अभियंता सुनील इंगळे रुजू होणार असून ते अनुभवी आहेत.

परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंता पदाचा कारभार  मुख्य अभियंता म्हणून डॉ. अनिल काठोये हे पाहत होते. नुकतीच त्यांची बदली मुंबई येथे झाली. त्यांच्या जागी  ऊरण येथील मुख्य अभियंता सुनील इंगळे रुजू होणार आहेत.

डॉ. अनिल काठोये यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे  मुख्य अभियंता म्हणून 19 जुलै 2023 रोजी पदभार स्वीकारला होता. आपल्या 11 महिन्याच्या कार्यकालात त्यांनी खूप धाडसी निर्णय घेत शिस्त लावत एक टीम च्या रूपात वीजनिर्मितीचे विक्रमही केले.  औष्णिक वीज  केंद्राने मागील २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४१०४.२६१दशलक्ष युनिट्स विक्रमी विजनिर्मिती केली आहे. अभ्यासू, कार्यतत्पर,कर्तव्यदक्ष  अधिकारी म्हणून वीज केंद्र कर्मचाऱ्यामध्ये परिचित होते.