🔷 दुर्दैवी घटना
बीड/परळी /एम एन सी न्यूज नेटवर्क –परळी शहरांनाजीक असणाऱ्या भोपळा गावातील तलावात पोहायला गेलेल्या एक युवक बुडाला असून त्याचे शोध कार्य घेण्यात येत आहे. ही घटना (दि. 19 ) रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. दरम्यान युवक तलावात बुडवल्याचे घटनेने खळबळ उडाली असून परिसरातील नागरिक तलावावर जमा झाले आहेत.
परळी अंबाजोगाई मार्गावर कनेरवाडी घाटात तुन एक रस्ता भोपळा या गावाकडे जातो. भोपळा येथील तलावात सकाळी साडेआठच्या सुमारास कनेरवाडी गावातील काही युवक येथे पोहण्यासाठी गेले होते. यात गणेश माणिकराव फड (वय 20) हा युवक तलावत बुडाला असून त्याच्या शोध घेणे चालू आहे. परळी नगरपालिकेचे अग्निशम पथकाच्या माध्यमातून तळ्यात बुडालेल्या युवकाचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. पोलीस घटनास्थळी असून, परिसरातील नागरिक ही मोठ्या संख्येने तलावर जमा झाले आहेत.