🔺 आरोग्य सेवा
बीड/परळी वैजनाथ/जलालपूर-एम एन सी न्यूज नेटवर्क-शहरा नजीक जलालपूर येथे एड्स जनजागृती व तपासणी शिबिर संपन्न! आज दिनाक 19/06/2024 रोजी जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक कक्ष जिल्हा रुग्णालय बीड व वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय परळी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आयसीटीसी विभाग उपजिल्हा रुग्णालय परळी वै. व TI प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने जलालपूर येथील हनुमान मंदिरामध्ये एच आय व्ही जनजागृती व तपासणी शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात प्रथम समुपदेशक श्री शरद चव्हाण यांनी उपस्थित लोकांना एच आय व्ही /एड्स ,टीबी गुप्तरोग या आजारांची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर आईसी वाटप करण्यात आली व प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री अमोल गालफाडे यांनी लोकांची रक्त तपासणी केली, आजच्या शिबिरात एकूण 75 लोकांची एच आय व्ही तपासणी करण्यात आली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी TI प्रकल्पाच्या ORW प्रियंका पोटभरे, छाया मुंडे, वैभव गुळवे व आशा वर्कर हेमा काळे, पूजा वाघमारे ,वर्षा मुंडे यांनी अथक परिश्रम घेतले.