राज्याचे नवे एटीएस प्रमुख नवल बजाज

नेमणूक /निवड

मुंबई- मागील सुमारे तीन महिन्यापासून रिक्त असलेल्या राज्य दहशतवादी विरोधी पथकाच्या प्रमुख पदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी नवल बजाज यांची बुधवारी नेमणूक करण्यात आली. पूर्वीचे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या प्रमुख पदी निवड झाल्यामुळे हे पद रिक्त होते.

नवल बजाज सध्या केंद्रात प्रतिनियुक्तिवर  सीबीआय मध्ये कार्यरत होते . नवल बजाज हे 1995 च्या भारतीय पोलीस सेवेच्या बॅच चे  अधिकारी आहेत.  सीबीआय मध्ये असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणाचा तपास केला आहे.  महाराष्ट्र केडरचे अधिकारी असलेले बजाज यांनी यापूर्वी मुंबई पोलिसांच्या प्रशासन शाखेचे सहाय्यक म्हणून ही काम पाहिलेले आहे.