🔷 सेवापूर्ती सन्मान सोहळा
बीड/अंबाजोगाई (प्रतिनिधी):– अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जोधप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गायकवाड तसेच संस्थेचे सेवक बालासाहेब पवार यांचा त्यांच्या २५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, प्रा वसंत चव्हाण, प्राचार्य डॉ बाबू खडकभावी, संस्थेचे संचालक संकेत मोदी,शंभुलिंग शिवाचार्य महाराज संस्थांचे अध्यक्ष ,महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
या सन्मान सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलन तथा माता सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या सन्मान सोहळ्याचे प्रास्तविक राजकिशोर मोदी यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात राजकिशोर मोदी यांनी प्राचार्य चंद्रकांत गायकवाड तसेच बालासाहेब पवार यांना सेवापूर्तीनिमित्त त्यांना शुभेच्छा देत त्यांना यापुढील काळात निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली. प्राचार्य चंद्रकांत गायकवाड यांनी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक भरभराटीत प्राचार्य चंद्रकांत गायकवाड यांचे मोठे योगदान असल्याचे राजकिशोर मोदी यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात देखील भरीव अशी कामगिरी केली असल्याचे मोदी यांनी सांगितले. पळसखेड्या सारख्या ग्रामीण भागातुन येऊन देखील प्राचार्य गायकवाड यांनी शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षित करून मोठमोठ्या पदावर पोचण्यासाठी प्रेरित केले असल्याचे राजकिशोर मोदी यांनी प्राचार्य गायकवाड यांच्या सन्मानारार्थ भाष्य केले.
यानंतर २५ वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त होत असल्याबद्दल प्राचार्य चंद्रकांत गायकवाड तसेच बालासाहेब पवार यांचा सपत्नीक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ फेटा बांधून तसेच सन्मानचिन्ह देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे,सचिव माधवराव पाटील, त्याचबरोबर सहसचिव सुनील मिटकरी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या सत्काराला उत्तर देतांना प्राचार्य चंद्रकांत गायकवाड हे अत्यंत भावूक झाल्याचे दिसून आले. त्यांनी राजकिशोर मोदी यांनी माझ्यासारख्या ग्रामीण भागातुन आलेल्या एका सामान्य शिक्षकावर विश्वास ठेवून संस्थेत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल राजकिशोर मोदी यांचे आभार व्यक्त केले. राजकिशोर मोदी यांच्या विश्वासावर पात्र ठरत आपणही त्याचा विश्वास सार्थ ठरवत संस्थेत काम केले. ही संस्था माझी व मी या संस्थेचा याच भावनेने आपण गेली २४ ते २५ वर्ष काम केले. इतकी वर्षे काम करून आज आपण संस्थेच्या कार्यातून मुक्त होत आहोत ही भावना माझ्यासाठी अत्यंत दुःख व वेदनादायी असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. माझ्या सेवाकाळात संस्थेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले.
संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांनी टाकलेला विश्वास, संस्थेच्या सर्व सहकाऱ्यांची साथ याच बळावर आपण या संस्थेत २५ वर्षे सेवा करू शकलो असल्याची भावना याप्रसंगी प्राचार्य गायकवाड यांनी व्यक्त केली. तसेच यापुढेही गरज पडल्यास संस्थेच्या कोणत्याही कामात आपण सदैव तत्पर राहुत अशी स्पष्टोक्ती देखील गायकवाड यांनी दिली. याप्रसंगी प्राचार्य गायकवाड यांनी संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ बी आय खडकभावी, प्रा वसंत चव्हाण यांचे देखील आभार व्यक्त केले.
बालासाहेब पवार यांनी देखील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळात २५ वर्षे सेवा केली. मोदी कुटुंव व बालाजी शिक्षण संस्था हा आपला निजी परिवार असल्याची भावना ठेवून त्यांनी आपले आयुष्य संस्था व मोदी कुटुंबासाठी खर्च केले. संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांचे सारथ्य अनेक वर्षे बालासाहेब पवार यांनी मोठया शिताफीने केले. मोदी कुटुंबाने देखील त्यांच्यावर पुर्णतः विश्वास टाकला होता दाखविलेला विश्वास पवार यांनी सार्थ ठरविला.शेवटी प्रा चंद्रकांत गायकवाड व बाळासाहेब पवार यांनी मोदी कुटुंबप्रति ऋण व्यक्त केले.
संस्थेच्या वतीने आयोजित सेवापूर्ती सोहळ्यास डॉ नवनाथ घुगे, डॉ राजेश इंगोले, डॉ सुधीर भिसे,डॉ रवी चव्हाण,डॉ होळंबे, डॉ संदीप चव्हाण, मुख्याध्यापक पवार सर , सुनील आवाड, जगताप सर, प्रा शाहूराव गुळभिले, गोविंद चव्हाण, गायकवाड आर बी आत्माराम चव्हाण, माजी सरपंच विठ्ठल चव्हाण, संदीपन चव्हाण, कल्याण भिसे, ऍड संतोष पवार, ऍड काकडे, तलाठी संतोष चव्हाण, रोटरी तथा कॉम्प्युटर वर्ल्ड चे संतोष मोहिते, प्रा एम असं लोमटे, घोडसे सर, शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट, भाई मोहन गुंड, श्रीरंग तट सर , विक्रम गुरुजी, के यांच्यासह गायकवाड, पवार व मोदी कुटुंबावर प्रेम करणारे शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात डॉ राजेश इंगोले यांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतीक समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध फेर निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी आकाश बाळासाहेब चव्हाण याची जलसंपदा विभागामध्ये (वर्ग 2 ) पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करून पुढील वाटचलीसाठी शुभेच्छादिल्या.या संपूर्ण कार्यक्रमाचे संचलन तथा आभार विजय रापतवार यांनी व्यक्त केले. हा सन्मान सोहळा पार पाडण्यासाठी श्री बालाजी शिक्षक प्रसारक मंडळाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले.
