डिसेंबर अखेर अहिल्यानगर ते बीड रेल्वे ट्रायल रन पुर्ण होणार; खा.बजरंग सोनवणें

🔷🔶खा.सोनवणेंचा मॅरेथॅान बैठकांचा धडाका  🔷 प्रशासनावर बसवली पकड

बीड: लोकसभा निवडणूकीत विजय मिळल्यानंतर सत्काराचे हार-तुरे घेत न बसता खा.बजरंग सोनवणे ताकतीने कामाला लागले आहे. नुकतीच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या मॅरेथॅान बैठका घेतल्या. यावेळी जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या रेल्वेबाबतीत आढावा घेतला. डिसेंबर अखेर अहिल्यानगर ते बीड रेल्वे ट्रायल रन पुर्ण होत असल्याची माहिती दिली. तर एक वर्षात परळीपर्यंत रेल्वेचे काम पुर्ण करा, अशा सुचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. मॅरेथॅान बैठकातून त्यांनी जिल्हा प्रशासनावर आपली चांगलीच पकड बसविली आहे.

खासदार बजरंग सोनवणे यांनी नुकतीच विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मॅरेथॅान बैठकां घेतल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या हॉलमध्ये झालेल्या बैठकीला आ.संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, लीड बँकेचे सर्व अधिकारी, विविध बँकांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद प्रशासनाकडे असलेल्या जलजीवन मिशन योजनेला मरगळ आलेली असून काही ठिकाणी अर्धवट कामे करून पैसे उचलले जात असल्याचे समोर येत आहे. यामुळे अधिकाऱ्यांनी कामे दर्जेदार करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. गावात पाणी देणे हे पुण्याचे काम असून सदरील कामे करताना सामान्य माणसाला पाण्यासाठी फिरण्याची वेळ येऊ येणार नाही अशा सूचना केल्या. अशा काही तक्रारी आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असे म्हणत अर्धवट कामांची पंधरा दिवसात प्रगती दाखविण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. शिवाय जलजीवन योजनेसाठी लागणारा निधी आणण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करू, पैशाची काळजी करू नका, असेही म्हटले. याच बरोबर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, सर्व शिक्षा अभियान आणि बचत गटांचाही आढावा घेण्यात आला.

बचत गटाच्या माध्यमातुन केंद्र शासकीय योजना अधिकाधिक कुटुंबापर्यंत पोचवणार, असा शब्दही खा.सोनवणे यांनी दिला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी वासूदेव सोळंके, डॉ.उल्हास गुंडाळ, शिक्षणाधिकारी फुलारी, शिंदे यांची उपस्थिती होती. यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीस आहिल्यानगर येथील रेल्वे विभागाचे उपमुख्य अभियंता श्री. आर.के.यादव व रेल्वेचे सर्व अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी खा.सोनवणे यांनी आढावा घेत जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या रेल्वे प्रश्नावर चर्चा केली. यावेळी डिसेंबरपर्यंत अहिल्यानगर ते बीड रेल्वे ट्रायल रन पुर्ण होणार असे त्यांनी ठामपणे सांगितले. याच बरोबर बीड- परळी रेल्वे मार्गाचे काम एक वर्षाच्या आत पुर्ण करा, रेल्वेचे कार्र्यालय बीड येथे आणन्यासाठी करावयाच्या योजनाची माहिती घेतली. त्यासाठी जे जे करता येईल ते करा, भुसंपादनाचे विषय तातडीत मार्गी लावा अशी तंबीही अधिकाऱ्यांना दिली. यावेळी लीड बँकेची देखील बैठक घेण्यात आली. जिल्ह्यात शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज द्या, कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक झाल्याची तक्रार आली किंवा त्यात तथ्य आढळले तर गाठ माझ्याशी आहे, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्यातील मराठा समाजातील तरूणांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज द्या, त्यांना स्वत:च्या पायावर उभा राहू द्या, असेही खा.सोनवणे म्हणाले.

🔷 खा.सोनवणे म्हणाले, चर्चा नको, काम दाखवा..

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या बैठकीत रस्त्याचे कामे संथगतीने सुरू आहेत. बैठकीत पालखी मार्ग असलेल्या पैठण-पंढरपूर मार्गाच्या विषयाला खा.सोनवणे यांनी हात घातला. या मार्गातील पाटोदा तालुक्यातील मळेकरवाडी घाटाचे काम अनेक वर्षापासुन रखडले होते. सदरील काम तातडीने सुरू करा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यानंतर एक तासात सदरील काम सुरू करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता अशोक इंगळे, सुर्यकांत गलांडे, सुनिता वनवे, प्रविण सुमंत, यांची उपस्थिती होती.

🔷 रखडलेली कामे सुरू करा

जिल्ह्यात राष्ट्रीय महार्गाची बहूतेक कामे रखडली आहेत. यात पैठण-पंढरपूर, खरवंडी- नवगण राजूरी, अहमदपूर- चुंबळी, परतूर-बार्शी, लातूर-पाथरी, अहमदनगर- बीड-परळी, गंगाखेड, खरवंडी कासार- पाडळसिंगी या रस्त्यांचा समावेश आहे. सदरील कामे येत्या सहा महिन्यात पुर्ण करा, जिल्ह्यातील नागरिकांच्या जिवीताशी खेळू नका, अशा सुचनाही खा.सोनवणे यांनी दिल्या.केज शहरातुन जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या थांबलेल्या कामांची गती वाढवुन गतीने कामे पुर्ण करणार आणि धारुर घाटातील रुंदीकरणाचे तसेंच उर्वरित काम वेगाने पूर्ण करुन घेणार, असेही ते म्हणाले.