गुणवंत विद्यार्थी गुण गौरव व करियर मार्गदर्शन भावसार युवा संस्थेचा उपक्रम

मार्गदर्शन गुणगौरव

गुणवंतांच्या गुणगौरव सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे – शैलेश प्रेमनाथ वैजवाडे

बीड/परळी-वैजनाथ -एम एन सी न्यूज नेटवर्क – १० वी व १२ वी बोर्ड परीक्षाचा निकाल लागला असून या मध्ये परळी शहरातील विद्यार्थी, विद्यार्थींनीनी मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल व त्यांच्या कर्तृत्वास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या वतीने परळी शहरातील गुणवंताचा गुणगौरव व करीअर मार्गदर्शन या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्राला अभ्यासू आणि तडफदार वक्ते म्हणून परिचीत निर्माते, दिग्दर्शक, गायक, संगीतकार, सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च न्यायालय, छत्रपती संभाजी नगर विधीज्ञ मा.ॲड. सुनील काकडे,तर प्रमुख पाहूणे भावसार समाजाचे बीड जिल्हाध्यक्ष प्रकाशदादा कानगावकर, भावसार समाज परळीचे अध्यक्ष प्रभाकर हजारे, माहेश्वरी महिला मंडळ परळी अध्यक्ष तथा समाज प्रबोधनकार सौ.दीपाताई बंग व भावसार समाज महिला अध्यक्ष सौ. सारिकाताई तांदळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
……………………………………………………………….
या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणार्‍या संस्थांचा सन्मान व गरजू होतकरू महिलांना शिलाई मशिन वाटप करण्यात येणार आहे
………………………………………………………………..
हा गुणगौरव सोहळा रविवार २३ जुन २०२४ रोजी सांय ०५.३० वा श्रद्धा मंगल कार्यालय, पावर हाऊस समोर, परळी वै. येथे होणार आहे.
तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भावसार युवा सेवाभावी संस्थेचे वतीने करण्यात आले आहे