परळीतील प्रख्यात प्रखर हिंदुत्ववादी डॉ. प्रकाश रामचंद्र डुबे यांचे निधन

बीड /परळी वैजनाथ- .. परळी शहर व परिसरातील सर्व परिचित असलेले जुन्या पिढीतील प्रतिथयश डॉक्टर त्याचबरोबर प्रखर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेले डॉ. प्रकाश रामचंद्र डुबे यांचे आज (दि.२२) सकाळी पावणेदहा वाजता राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

डॉ. प्रकाश रामचंद्रराव डुबे हे परळी शहरातील सर्व परिचित व्यक्तिमत्त्व होते. प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करणारे डॉक्टर म्हणून त्यांचा सर्वांनाच परिचय आहे. हिंदू धर्म संस्कृती, धर्माचरण, योग व वैदिक सनातन हिंदू धर्म तत्त्वाचे प्रखर पुरस्कर्ते म्हणून त्यांनी आपली वाटचाल केली. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी आंदोलनातही ते सक्रिय होते. आपली वैद्यकीय सेवा बजावतानाच प्रखर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करून त्यांनी धर्म व संस्कृती रक्षणाचे अनमोल कार्य केलेले आहे.

डॉ. प्रकाश डुबे यांना आज सकाळी ९.४५ वा. सुमारास राहत्या घरीच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी ते 74 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.