कार्यालयात ९.१५ नंतर आल्यास लागणार ‘हाफ डे’

🔷 लेटलतीफ- वेळेचं बंधन

नवी दिल्ली : कार्यालयात वेळेवर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. सकाळी नऊ वाजेच्या ड्युटीला जास्तीत जास्त सव्वानऊ वाजेपर्यंत हजर राहून बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

कार्यालयात उशिरा म्हणजे ९ वाजून १५ मिनिटांच्या नंतर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ‘हाफ डे’ लावण्यात येईल.