मराठा समाजाच्या सुख दुःखात कायम पाठीशी राहणार- मंत्री प्रा. तानाजी सावंत

🔶 मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या देठे कुटुंबीयांना कुटुंब बालकल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी दिला मदतीचा हात

पुणे -प्रतिनिधी:- मराठा आरक्षणासाठी नुकतीच आत्महत्या केलेल्या प्रसाद देठे यांच्या कुटुंबियांना राज्याचे कुटुंब व कल्याण मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी सांत्वन पर भेट देऊन त्या कुटुंब यांना आधार देत 5 लाख रुपये सुपूर्द केले आहेत. दरम्यान मराठा समाजाच्या सुखदुःखात आपण कायम पाठीशी राहणार असल्याचे कुटुंब बालकल्याण मंत्री मराठा भूषण प्राध्यापक तानाजी सावंत यांनी सांगितले.

वाघोली, पुणे येथे मराठा आराक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कै.प्रसाद देठे यांच्या कुटुंबाची महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मराठा भूषण तानाजी सावंत यांनी भेट घेत सांत्वन केले. त्या कुटुंबाला पाहता क्षणी मंत्री प्रा. तानाजी सावंत यांना अश्रू अनावर झाले. समाजाप्रती असलेला कळवळा व समाजाला मदत करण्याची दानत त्यांनाच असते. ज्यांना आपल्या मातीला व समाजाला बसलेल्या चटक्याची जाण असते. याचीच प्रचिती येत आहे. मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी आजपर्यंत शेकडो गरजू व मराठा समाजासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांना मदतीचा हात दिला आहे. मराठा समाजाच्या तरुणांनी आरक्षणासाठी आपले जीवन संपवु नये. असे आवाहनही मराठा समाजाच्या युवकांना मंत्री प्रा सावंत त्यांनी केले आहे. यावेळी मराठा समाजातील असंख्य बांधव उपस्थित होते.

मुला मुलींना घेतले दत्तक
मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिलेल्या प्रसाद देठे यांना तात्काळ पाच लाख रुपयाची मदत करत त्यांच्या कुटुंबातील देठे यांचा मुलगा आणि दोन मुली अश्या तिन्ही मुलांना दत्तक घेत मुलांच्या शिक्षणापासून विवाहापर्यंतची सर्व जवाबदारी आपण घेत असल्याचे यावेळी मंत्री प्रा. तानाजी सावंत सांगितले.आज तागायात मराठा समाजाच्या जवळ पास 90 ते 100 कुटुंबांना आर्थिक मदत करून मुलांना दत्तक घेऊन त्यांच पालकत्व प्रा.सावंत पार आहेत.