🔶 प्रवेश परीक्षा- निकाल
बीड : नीटनंतर नेट व सीईटी सेलतर्फे झालेल्या परीक्षेच्या निकालानंतर इंजिनिअरिंग व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगचे प्रवेश अजूनही सुरु झालेले नाहीत. त्यामुळे पालकांना विद्यार्थी प्रवेशाबाबत चिंता आहे, आता एमएचटी-सीईटी-२०२४ या सामाईक प्रवेश परीक्षेच्या निकालासंदर्भात (पीसीएम व पीसीबी गट) विविध आक्षेप घेण्यात आले आहेत.
दरम्यान तांत्रिक बाबींच्या परिपूर्ततेनंतर विद्यार्थ्यांना २७ व २८ जून रोजी सीईटी सेल कक्षाच्या वतीने संकेतस्थळावरुन त्यांच्या लॉगइनमध्ये उत्तरपत्रिका व उत्तरतालिका पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित असल्याचे तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
