कांगारू चा पराभव करून भारताची सेमी फायनल मध्ये मारली धडक

🔷क्रिकेट टी २० विश्वचषक

🔷 भारताने ऑस्ट्रेलियाला हरवलेः सुपर-८  सामन्यात कांगारूचा २४  धावांनी केला पराभव .

सेंट लुसिया- भारताने २४ धावाने विजय मिळवत टी-२०  वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. हा संघ पाचव्यांदा या स्पर्धेच्या टॉप-४  मध्ये पोहोचला आहे. गतविजेत्या इंग्लंडचा उपांत्य फेरीत भारताचा सामना २७  जून रोजी रात्री ८.००  वाजता गयानाच्या मैदानावर होणार आहे.

वेस्ट इंडिजच्या सेंट लुसिया येथे सोमवारी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. भारतीय कर्णधार रोहित शर्माने ४१  चेंडूत ९२  धावां काढल्या त्याने ७  चौकार आणि ८  षटकारांच्या मदतीने केल्या. सूर्यकुमार (३१), शिवम दुबे (२८) आणि हार्दिक पंड्या (२७) यांनी संघाची धावसंख्या २०५  पर्यंत नेली. या T-२०  विश्वचषकात संघाने प्रथमच २००  पेक्षा अधिक धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने 4 षटकात केवळ 14 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. हेझलवूड शिवाय प्रत्येक गोलंदाजाने आपल्या षटकात 10 पेक्षा जास्त धावा दिल्या.
तर लक्ष गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाने १३  षटकांत २  बाद १२८  धावा केल्या. त्यानंतर अखेरच्या 7 षटकांत भारतीय गोलंदाजांनी कांगारू संघाला २०  षटकांत १८१/७  धावांवर रोखले.

अर्शदीप सिंगने टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड वॉर्नरच्या विकेट घेतल्या, तर कुलदीप यादवने ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्शला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.