युवा उद्योजक राजेभाऊ फड विधानसभेच्या आखाड्यात

बीड/परळी वैजनाथ- गावाचा विकास, सर्वसामान्य जनतेच्या समस्या व उपाय योजना करणारा युवा उद्योजक राजेभाऊ फड यांनी विधानसभेच्या आखाड्यात उड्डी मारावी अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून होत आहे.

परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी त्या गावाचा विकास व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निकाली काढण्याची मोठी हातोटी आहे. विशेष म्हणजे कन्हेरवाडी गावाचे सरपंच पद गेल्या २५ वर्षापासून राजेभाऊ फड याच्याकडे असून वडील सरपंच, आई नंतर मुलगा सरपंच राजेभाऊ फड हे सध्या आहेत. विशेष म्हणजे

माजी आ. संजय दौड यांचा पराभव करून मार्केट कमिटीमध्ये संचालक झाले. कन्हेरवाडीचे व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी ५ वर्षे पारंदर्शक कारभार म्हणून काम केले. राजेभाऊ फड वंजारी समाजाचे असले तरी ही त्यांचा अठरापगड्ड समाजातील लोकांशी कुंटूंबा प्रमाणे संबंध आहेत. त्यांनी कधीच आयुष्यात खाजगी किंवा व्यवसाय व राजकारणात आणि समाजकारणात जातीभेद केला नाही. सर्वांना सारखाच न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आदर्शाचे पालन करणारा युवक नेता म्हणून परळी मतदारसंघात त्यांची ओळख आहे. परळी विधानसभा मतदारसंघाचा विकास बारामती सारखा व्हावा असाच त्यांचा दृष्टीकोन आहे.

म्हणून परळी मतदारसंघाचा सर्वागीण विकास करणची धमक राजेभाऊ फड यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांनी विधान सभेच्या निवडणुक रिंगात उतरावे अशी मागणी बहुजन समाजाची जनतेची होत आहे.